महाड क्रांती दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीराना अभिवादन
येवला (प्रतिनिधी)
तथागत गौतम बुद्ध, क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातून पाणी,पाण्याचा वापरावर सर्वांना समान अधिकार आहे हेच अधोरेखित करत असून पाण्याचा वापर हा सर्व सजीव,प्राणी पशूना निसर्गाने दिलेला व शिकवलेला सामाजिक न्याय आहे.बुद्ध,फुले,आंबेडकरांच्या जीवनातील पाणी संगर/संघर्ष हा सामाजिक न्यायासाठीच होता जो युगेनयुगे अखंड मानवास दिशादर्शन करील असे उदगार शरद शेजवळ यांनी काढले.
२० मार्च १९२७ च्या महाड क्रांती दिनाचे अवचित्य साधून येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेत महाड क्रांती स्मृती अभिवादन सभेत मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ बोलत होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९४२ ते ४६ व्हाइसरॉय च्या मंत्रिमंडळात असतांना दामोदर विकास खोरे,सोननदी विकास खोरे,हिराकुंड नदी विकास खोरे स्थापवून त्या धरणांची कामे पूर्ण करून वीज मंडळ,लिफ्ट एरिकेशन (पाटबंधारे विभाग),नौका नयन,मत्स्य व्यवसाय,पर्यटन विकास मंडळ आदी पाणी विषयावर केलेली कामे हि आधुनिक भारताची पवित्र मंदिर असल्याचा भारताचे पहिले प्रधान मंत्री पंडित नेहरू यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला गौरव पाणी व पाण्याच्या अनुषंगाने बाबासाहेबांचे कार्य ह्या विषयावर अभ्यास पूर्ण माहिती शेजवळ यांनी ह्या वेळी करून दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश खळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून अभिमन्यू शिरसाठ विकास सिंगाडे, सचिन धनवटे,राकेश बोरसे,सिद्धार्थ सिंगाडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ यांनी केले.
अक्षय गरुड,ललित भांबेरे, साहिल जाधव,प्रमोद वाघ,अजित कळले,जीवन दळे,कुणाल ठाकरे,पंकज घुले आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.