सातारा : भीमा-कोरेगाव हल्ल्यातील मुख्य फिर्यादी व साक्षीदार यांचे निधन झाले आहे.
भीमा-कोरेगाव लढ्यात ते अग्रणी होते. त्यांनी त्यांचे घरदार गमावले होते.याच प्रकरणामुळे त्यांची अल्पवयीन मुलगी पूजा हिची आत्महत्या देखील घडवण्यात आली होती. न्यायाशिवाय आणि धर्मांतराच्या इच्छेशिवाय त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांनी प्रचंड दुःख सहन केल्यानंतर भीमा – कोरेगाव हल्ल्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. शिवाय, मातंग म्हणून जन्माला आलो तरी मातंग म्हणून मरणार नाही.मला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या बौद्ध धम्माच्या रस्त्यावर जायचे आहे. असे अभिवचन त्यांनी चैत्यभूमी येथे जाऊन दिले होते.अशा लढवय्या भीमसैनिकास अनेकांनी आदरांजली अर्पण केली आहे.