भेंडखळ गावात रंगला हळदी कुंक आणि खेळ पैठणीचा सोहळा.

0

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील भेंडखळ गाव म्हणजे सांस्कृतिक परंपरेने नटलेलं गाव.या गावात दरवर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.त्यातीलच महिला भगिनींसाठी आनंदाचा सोहळा म्हणजे हळदी कुंकू समारंभ होय. भेंडखळ गावातील समस्त महिला भगिनींसाठी हळदीकुंकू सोहळ्या बरोबरच मनोरंजनात्मक खेळ आणि खेळ पैठणीचा अशा सुंदर कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते .ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मंजिता पाटील,उपसरपंच  स्वाती पाटील, विद्यमान सदस्य सोनाली ठाकूर,संगीता भगत,शीतल ठाकूर, स्वाती घरत, अक्षता ठाकूर, प्राची पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य अजित ठाकूर,अभिजीत ठाकूर, दीपक ठाकूर, लिलेश्वर भगत तसेच ग्रामपंचायत अधिकारी समिक्षा ठाकूर, क्लार्क कुमारी दीपा या सर्वांनी मिळून हळदी कुंकू समारंभ, मनोरंजनात्मक खेळ आणि खेळ पैठणीचा अशा तिहेरी कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केले होते.

             

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणपती बाप्पा, सरस्वती माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अगदी सुरुवातीलाच ज्येष्ठ महिला वर्गासाठी कापसाच्या वाती बनविणे हा खेळ घेण्यात आला. त्याचप्रमाणे केसांमध्ये स्टॉ लावणे,फुगे फुगविणे, संगीत खुर्ची अशा पद्धतीचे मनोरंजनात्मक खेळ घेऊन गावातील समस्त महिला भगिनींचं मनोरंजन करण्यात आले होते.गावातील सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे या सर्व खेळांमध्ये सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद लुटला. या सर्व खेळांमध्ये विजयी महिलांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आकर्षक बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले .तसेच या विजयी महिलांमध्येच पैठणी जिंकण्यासाठी खेळ  रंगला.यात  प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या  विजेत्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.  

           

तदनंतर गावातील समस्त सुहासिनी महिला भगिनींना हळदी कुंकवाचे वाण देऊन भेटवस्तू देण्यातआल्या. दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता सायंकाळी सहा वाजता झाली. संपूर्ण कार्यक्रम अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत भेंडखळ ,सरपंच,उपसरपंच, सर्व  सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, तसेच कर्मचारी वर्ग गावातील सीआरपी यामध्ये मिलन म्हात्रे, प्रीती भोईर, ज्योती ठाकूर, कल्याणी ठाकूर, प्रमिला ठाकूर तसेच महिला बचत गट वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना माळी व उमंग भोईर या दोघांनी अत्यंत सुरेखरित्या केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here