महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनचे जेएनपीटी समुद्र मार्गाचे चॅनेल बंदचे आवाहन

0

जेएनपीटीचे समुद्रातील चॅनेल बंद करून चारही कोळीवाडा गावचे ग्रामस्थ करणार शासनाचा निषेध.

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात जेएनपीटी (जेएनपीए ) प्रकल्प उभे राहताना शेवा कोळीवाडा गावातील जमीन संपादित करण्यात आली. या गावातील ग्रामस्थांचे उरण तालुक्यात नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा येथे पुनर्वसन केले. मात्र या पुनर्वसन गावात म्हणजेच हनुमान कोळीवाडा गावात कोणत्याही मूलभूत सेवा सुविधा नाहीत. सर्वच घरांना वाळवी लागली आहे. हे ठिकाण मानवी वस्तीस राहण्या योग्य नाही. तसेच या ग्रामस्थांनी आपल्या पिकत्या जमिनी जेएनपीटी प्रकल्पला (बंदराला )कवडीमोल भावात दिल्याने उपजीविकेचे कोणतेही साधन या ग्रामस्थांना उरले नाही.शासनाने नोकऱ्याही दिल्या नाहीत.या ग्रामस्थांना शासनातर्फे नोकऱ्याही मिळाले नाहीत. त्यामुळे गेली ३८ वर्षे हनुमान कोळीवाडाचे ग्रामस्थ आपल्या पुनर्वसनासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी प्रशासनासोबत भांडत आहेत.३८ वर्षे केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात पत्रव्यवहार करूनही या ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी, ग्रामस्थांनी दिनांक ८/१/२०२३ पासून शेवा कोळीवाडा गावात आपल्या मूळ गावी राहण्यास गेले आहेत. तिथे साफसफाई करून राहण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी गव्हाण कोळीवाडा, बेलपाडा कोळीवाडा,बोरी कोळीवाडा आणि हनुमान कोळीवाडा अशा चार कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी शेवा कोळीवाडा JNPT येथे एकत्र येऊन जे एम बक्षी चे समुद्रामार्गे येणारे जहाज अडवून(चॅनेल बंद करून )त्यादिवसा पासून एकच वेळी मासेमारी करण्याचा ठराव घेतला आहे.महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून हे चॅनेल बंद करण्यात येणार आहे.

JNPT नी दि. ०९/०१/२०२३ रोजी दिलेल्या पत्रात गेल्या ४० वर्षात बेरोजगार केलेल्या मासेमार पिढीजात कामगारांना कोणालाही नोकऱ्या दिल्या नाहीत याची कबुली दिलेली आहे. JNPT ने हनुमान कोळीवाडा, उरण कोळीवाडा, बेलपाडा कोळीवाडा, गव्हाण कोळीवाडा या ४ कोळीवाड्यातील १६३० पारंपारिक मच्छिमार कुटुंबांचा ४० वर्षात रोजीरोटी हिरावून घेऊन वर कोर्टकचेरीत छळ केल्या नंतर JNPT नी मा. सुप्रीम कोर्टात केलेला अपील मागे घेतलेला आहे. आणि सन २०१२ ते २०१४ या तीन वर्षाची मासेमारी धंद्याची हानीची नुकसान भरपाई देणार आहेत ती अद्यापही दिलेली नाही. मा. NGT ने दि. २७/०२/२०१५ रोजी दिलेल्या आदेशात JNPT ला मासेमारी जमीन पूर्ववत करण्यास सांगितली होती. पण आजतागायत केलेली नाही. उलट मासेमारी जमीन नष्ट केलेली आहे. आणि न्हावा गावात जेट्टी बांधत आहेत. ते पारंपारिक मच्छिमारांचे गाव नाही. त्या जेट्टी मुळे न्हावा शेवा खाडीचे मुख बंद होईल.त्यामुळे झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ जेएनपीटी समुद्र मार्गातील चॅनेल बंद करून मासेमारी करण्याचा निर्णय महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतला आहे.

– सरपंच परमानंद कोळी

ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा.

कामगार  अधिनियम व नियम आणि मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ च्या खंड २ चा उप खंड (घ) संविधानाद्वारे हमी दिलेले किंवा आंतरराष्ट्रीय प्रसविदेमध्ये समाविष्ट केलेले आणि भारतामध्ये न्यायालयात अमलात आणण्याजोगे असलेले व्यक्तीचे जीवन स्वातंत्र्य, समानता व प्रतिष्ठा संबंधातील हक्क व खंड २ चा उप खंड (च) नागरी व राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय प्रसविदा आणि १६ डिसेंबर १९६६ रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये स्वीकारण्यात आलेल्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांवरील आंतरराष्ट्रीय प्रसविदानुसार मानवी हक्क दिलेले आहेत. त्या मानवी हक्कांचा जाणिवपुर्वक केंद्र व राज्य सरकारचे शासकीय अधिकाऱ्यांनी भंग केला आहे. आणि भंगास प्रतिबंध करण्यात हयगय केली असल्याची आणि मासेमार पिढीजात कामगारांना बेकार केली असल्याची सत्य परिस्थिती आणि वस्तुस्थिती पुराव्यासहित सिद्ध केलेली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ऍथॉरिटीचे व्यवस्थापन JNPA च्या सर्व एक्स्टेंशन व सेझ प्रकल्पात मा. जिल्हाधिकारी रायगडने आयडेंटिफाय केलेल्या हनुमानकोळीवाडा, उरणकोळीवाडा, बेलपाडाकोळीवाडा, गव्हाणकोळीवाडा या ४ कोळीवाड्यातील १६३० प्रकल्प बाधित पारंपारिक मच्छिमार कुटुंबातील पिढीजात कामगारांना नोकऱ्या देत नसल्याच्या निषेधार्थ ती कुटुंबे मासेमारी जमिनीत घारापुरी मोरा दरम्यान J.M. Baxi च्या उदघाटनाचे दिवसा पासून महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून एकत्र मासेमारी करणार असल्याचा गुरुवार दि. १९/०१/२०२३ रोजी बैठक घेऊन एकमताने एकमुखी ठराव पास केलेला आहे.तरी पुराव्या वरून शासनाने निर्भय व निर्भिड आणि निःपक्षपाती पणे पिढीजात मासेमार कामगार यांना न्याय द्यावा. हि प्रार्थना आहे.

– रमेश कोळी

जनरल सेक्रेटरी – महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here