मांढरदेव यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुख्य जिल्हा न्यायाधीश व जिल्हाधिकाऱ्यांकडून मांढरदेव परिसराची पहाणी

0

सातारा दि. 4  :  मांढरदेव यात्रा अनुषंगाने  प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी श्री काळुबाई मंदिर व मांढरदेव परिसराची पहाणी केली.

मांढरदेव यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मांढरदेव परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे  व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी संयुक्तपणे केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  

  मंदिर ट्रस्ट व प्रशासनाच्या विविध विभागानी केलेली तयारी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून तयारी बाबत समाधान व्यक्त केले व कर्तव्यवर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यात्रा कालावधी दरम्यान दक्ष राहून काम करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here