पैठण,दिं.२२: माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत आज ग्रामपंचायत आवडे उंचेगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथील अंजली हिवाळे , (विभागीय तांत्रिक तज्ञ) यांनी भेट देऊन ग्रामपंचायत आवडे उंचेगाव तालुका पैठण येथील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शैचालय वापर, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत, वृक्षलागवड व हेरिटेज वृक्षांचे संवर्धन, जलसंधारण, सार्वजनिक स्वच्छता, शास्वत स्वच्छता अंतर्गत प्रचार प्रसिद्धी, लोक उपयोगी व लोकांमार्फत व लोकांच्या नियंत्रणाखाली चालू असलेली विविध नाविन्यपूर्ण विकास कामे व विविध उपक्रमाची पाहणी केली व ग्रामपंचायत आवडे उंचेगाव यांनी केलेल्या कामावर व चालू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथील अंजली हिवाळे , (विभागीय तांत्रिक तज्ञ)), श्री.इंगळे विस्तार अधिकारी (पंचायत), दशरथ खराद , जनजीवन मिशन समन्वयक पंचायत समिती पैठण यांनी विविध कामांची पाहणी करून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत अपेक्षित असलेल्या कामाबाबत व सादरीकरणा बाबतीत यथा उचित मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत आवडे उंचेगाव चे ग्रामसेवक शिवराज पाटील गायके यांचे कार्यलयीन कामकाज, कामकाजातील पारदर्शकता व नागरीकांना विकास कामात सहभागी करून घेणे, या काम करण्याच्या शैलीवर समाधान व्यक्त करून अति उत्कृष्ट काम असा शेरा देखील अंजली हिवाळे यांनी यावेळी दिला.
यावेळी सरपंच सौ.ज्योती सतीश आंधळे, उपसरपंच सौ.भारती सिताराम काकडे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर निकाळजे, मोहन पाचे, दिपक लांडगे,अनिता काळे, रेणुका लांडे, रेश्मा भुसारे, रोहिदास आवारे, किशोर वाकडे, अच्युत जाधव, हरिश्चंद्र निकाळजे व ग्रामसेवक शिवराज गायके उपस्थित होते.