पैठण : सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर १३ दात्यांनी रक्तदान केले.तथा विविध सामाजिक क्षेत्रातील ५१ व्यक्तीनां सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करन्यात आले.हा सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्रात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह.भ.प.भगवान माहाराज जंजाळ,वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्व रेंगें,डॉ.कैलास झीने,वर्षा व्हगाडे स.पो.नि.,मनोज कदम उद्योजक, संजय सोनवणे ना. तहसीलदार हे होते.व रिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी सुमित पंडीत कशा प्रकारे पोलिस दलास सहाय्यता करतात,ज्यात वाहतूक सुरक्षेसाठी जनजागरण करतात , बेटी बचाव,रक्तदान शिबिर , व्यसन मुक्ती,हुंडाबंदी,सामाजिक कुप्रथेवर चार्लीच्या भुमिकेत पथनाट्य सादर करतात,व समाज जागृती करतात,यावेळी अनेक मान्यवरांनी सुमीत पंडीत यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला , या प्रसंगी ५१ व्यक्तीनां सेवा गौरव पुरस्काराने सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले.यात ह.भ.प.भगवान महाराज जंजाळ,रामेश्वर रेंगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,डॉ.कैलास झिने, सिताराम मेहेत्रे वरिष्ठ पोलीस निरिक्षक,डॉ.निलकंठ पाटील,देविदास गात वरिष्ठ पोलीस निरिक्षक,संजय सोनवणे ना.तहसीलदार,अशोक मुदीराज वरिष्ठ पो.नि.,निता कायटे ए.पी.आय,श्रद्धा वायदंडे ए.पी आय,जयराम धनवई,मनोज कदम उद्योजक,अनिता फसाटे,पंकज चावला,ज्योती गिरी,शशिकांत तायडे,प्रा.शरद सोनवणे,संस्कृती ग्लोबल स्कुल बाबासाहेब मोराळकर,एकनाथ कोळी,राजेश वाघ,अजय झरकर, जकीया नूर बानो सय्यद साबेर, प्रा.भिमसिंग राजपूत,सुभाष घुगे,गोकुळ खटावकर,सिद्धार्थ सोनवणे,कृष्णा वडगांवकर, चंद्रकांत गिते,राजेंद्र वाघ,दिपक पवार,मंगलदास मोरे,वर्षा मुंढे, गणेश सेठी,परवेज खान,नितीन दांडगे,स्नेहा दुधाळ,योगेश बोखारे,सुनील शिंदे,शेख रफीक, छबिलदास पाटील,अनिल साबळे,फिरोज शेख,शामकुमार पुरे,गिरीश काळेकर,प्रदीप विखे,रंजना प्रशांत दंदे,नरेश मेहता,राजेंद्र जोंधळे,सोहेल कादरी,यांना सन्मान पत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी स्नेहा दुधाळ यांनी लावणी नृत्य सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.
ज्युनिअर भाऊ कदम यांनी सांगितले आपल्या कला साधर केल्या.जूनियर चार्ली सोमनाथ स्वभावणे व शंकर दुबे यांनी सावधान सावधान पोलीस है अपने साथी या गीतातून मुख अभिनयातुन आपली कला सादर केली. कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले ते माणुसकी समुह.
मुक्ताराम गव्हाणे,देविदास पंडित, समाजसेवक सुमित पंडित,गजानन क्षीरसागर,ज्ञानेश्वर पंडित,कल्पेश पंडित,विनायक ढवळे,रोहित तारे,मनोज बेलकर,पुजा पंडित,मिराबाई पंडित,सुनिता ढवळे,सहकार्य केले,कार्यक्रमाचे सुत्र संचालन अंजली चिंचोलेकर यांनी केले.व आभार शरद सोनवणे यांनी मानले.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
*जो दुसऱ्याचे सुख दुःख वाटून घेतो तोच खरा माणूस*
*…..ह.भ.प भगवान महाराज*
महाराजांनी आपल्या वाणीतुन समाजाला प्रबोधनातुन उपदेश करतांना म्हणाले की जो दुसऱ्याचे सुख दुःख वाटून घेतो तोच खरा माणूस..जेका रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपले.. तोची साधु ओळखावा देव तेथेशी जानाव..या वुक्तीप्रमाने भगवान महाराज जंजाळ महाराज यांनी सुमित व पुजा यांच्या अहोरात्र समाजासाठी झटत असल्याबद्दल कौतुक केले.ते म्हणाले सुमित यांची भेट एका बेवारस महिलेच्या अंत्यसस्काराच्या वेळी झाली. आणि ह्या तरुणाचे विविध ४२ सामाजिक उपक्रम ऐकूण भारावलो सुमित यांच्या करोना काळातील लोकांसाठी काम ज्यात भुकेल्याला अन्न गरजूंना वैद्यकीय मदत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता केले. यात त्यांना व कुटुबिंयांना कोरोनाने घेरले ही धावपळ धडपड बघून खरच माणासात देव शोधणारा खरा तरुण समाजसेवक मी अनुभवला या सामाजिक योध्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.त्यांनी पुरणातील दाखले देऊन माणूसकी कशी जपावी याचे उदःहरणे दिली. कार्यक्रमात बोलताना म्हणाले की समाजसेवक सुमित पंडित यांनी जे माणुसकीचे छोटेसे वृक्ष लावले आहे आजच्या या कार्यक्रमातून सिद्ध होते की त्यांची कार्याचे फलीत कुठेतर वटवृक्ष झाले आहे.असे मला वाटते इतर ठिकाणी पैसे खर्च करण्यापेक्षा माणुसकी समूहाला ते दान करा आपल्याला निश्चितच माणुसकीचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.
–—- ह.भ.प.भगवान महाराज जंजाळ