माहूर : आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माहूर तहसील कार्यालयात तहसीलदार किशोर यादव यांनी महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान, सत्कार केला.
आज महिला ह्या विविध क्षेत्रात भरारी घेत आहेत. दिवसेंदिवस महिलांची मोठी प्रगती होत आहे. चूल आणि मूल एवढेच न पाहता शिक्षणाच्या माध्यमातून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होताना पहावयास मिळत आहे.
बुधवारी जागतिक महिला दिनानिमित्त तहसीलदार किशोर यादव यांनी महसूल च्या महिला कर्मचारी डी.बी.पाचपोर,सुनिता मेश्राम,अनिता कुडमते, वर्षा डहाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या सत्कार, सन्मान केला. यावेळी माहूर नगरपंचायत चे मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड उपस्थित होते.