माॅं साहेब ..
तुम्हांमुळे माॅं साहेब
स्वराजोत्सवसोहळा
स्वराज्यात सुरक्षित
श्वास घेतो मोकळा
राज्यासाठी अर्पिला
जीवपोटचा कोवळा
मराठ्यांचे राज्ययेवो
सार्थ असे कळवळा
पारखून सुलाखून तू
घडवी सक्षम मावळा
मातीसाठी प्रेमापोटी
प्रत्येक जण बावळा
जाणता राजा बनवी
पदरात बांधी वादळा
औरंग्या दिला हादरा
काढी खान कोथळा
शतके लोटले तरीही
जाणवी आऊदर्वळा
आऊ ममतेचा झरा
जागृत तो जिव्हाळा
कधीतरी टेका माथा
सिंदखेडराजा स्थळा
जगत् जननी स्नेहा
आयुष्य होई सुफळा
जिजाऊ ..
गाठता येईना उंची
किती पोवाडे गाऊ
उतुंग मेरू पर्वतचं
तशी माय जिजाऊ
वरूनि खंबीर जरी
तरी लोण्यापरी मऊ
गुणांचा खजिना तो
केवढा भरून घेऊ
सिंधखेडजन्मस्थळ
कधी एकदा जाऊ
वाचूं इतिहासा तव
सुख वर्षावां न्हाऊ
तिथली पावन माती
भाळी कपाळी लावू
जिजाऊ सृष्टी बनते
तृप्तता नजरेत पाहू
उपकृत जन्मांतरीचे
कशी उतराई होऊ
जाणून विचार धारा
दाविले सन्मार्गे जावू
पुत्र लखलख सूर्य
धन्य तयाची आऊ
वाटे कित्येकां तव
उदरी जन्मास येऊ
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.