मूल्ये जपणारा शिक्षक सेवानिवृतीनंतरही आदर्शच : मारोतराव पवार

0

सावरगाव येथे प्राचार्य ढोमसे यांचा सेवापूर्ती सोहळा

येवला, प्रतिनिधी :

 शिक्षक सर्वगुणसंपन्न असावा,म्हणजे समाजाला तो आदर्शांची शिकवण देतो.ज्ञानात नेहमी अपडेट राहणारा व मूल्ये जपणारा शिक्षक सेवानिवृत्त झाल्यावरही समाजासाठी आरसा असतो.शिक्षक,व्यक्ता,प्रवचनकार,भजनी आणि मूल्यांचा संचय असलेले प्राचार्य शरद ढोमसे असेच व्यक्तिमत्त्व असून आजही ते नव्या-जुन्या पिढीला आदर्श असल्याचे प्रतिपादन माजी आमदार मारोतराव पवार यांनी केले.

सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कुल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शरद ढोमसे यांच्या सेवापूर्तीच्या सोहळ्यात ते बोलत होते.गोजराई पॅलेस येथे सावरगाव ग्रामस्थ, संभाजीराजे पवार मित्र मंडळ व विद्यालयाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शिक्षक आमदार किशोर दराडे,शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल संस्थेचे सरचिटणीस प्रमोद पाटील,माजी शिक्षण उपसंचालक दत्तात्रय जगताप,महानंदा दुध मुंबईचे अध्यक्ष राजेंद्रबापू जाधव, लासलगाव मर्चंटचे माजी अध्यक्ष रमेश शिंदे,विनता ढोमसे,माजी सभापती संभाजीराजे पवार,जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष डॉ. नवलसिंग पवार,अर्जुन कोकाटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी संभाजीराजे पवार मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती तर शिक्षण प्रसारक मंडळ व विद्यालयाच्या वतीने सोन्याच्या लक्ष्मीचे नाणे भेट देऊन यांच्या ढोमसे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार दराडे म्हणाले की शिक्षकांचे प्रश्न सोडविणे हाच माझा ध्यास आहे, त्यासाठी शासन दरबारी नियमित आवाज उठवत राहील.आपल्या मुलाला तहसीलदार बनवून श्री.ढोमसे यांनी समाजापुढे आदर्श उभा केला आहे.विद्यार्थी तळमळ ठेवणाऱ्या अशा शिक्षकांची समाजाला गरज असल्याचे दराडे म्हणाले.तेहतीस वर्ष विद्यार्थी घडवितांना शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे उत्तमोत्तम योगदान देणारे ढोमसे आजच्या शिक्षकांना प्रेरणादायी असल्याचे जगताप म्हणाले.शाळेचा विकास हाच ध्यास बाळगून काम करणारे ढोमसे शिक्षण क्षेत्राला मार्गदर्शक असल्याचे कोकाटे म्हणाले.शिस्त मार्गदर्शन आणि तितकेच प्रेम काय असते हे एका शिक्षक बापाकडून शिकायला मिळाले,म्हणूनच पहिल्या प्रयत्नात एमपीएससी यशस्वी होऊन अल्पवयात तहसीलदार होऊ शकलो अशी भावना त्यांचा मुलगा शारंग ढोमसे यांनी व्यक्त केली.यावेळी कुटुंबिय व नातेवाईकांनी आयुष्यभर कुटुंबवत्सल व शाळाप्रिय असलेल्या ढोमसे यांच्या कार्याचा गौरव केला.शाळा हे माझे मंदिर आणि विद्यार्थी माझे दैवत ही एक संकल्पना आयुष्यभर बाळगून कुटुंब व शाळा या दोन्हींना मी एकच मानले,म्हणूनच ३३ वर्ष अतिशय आनंदाने विद्यार्थी घडविणारी सेवा देऊ शकलो.मी दिलेल्या सेवेचे मला आत्मिक समाधान असल्याचे सत्कार्याला उत्तर देताना ढोमसे यांनी सांगितले. यावेळी मागील दोन वर्षात काळात सेवानिवृत्त झालेले दिलीप अहिरराव,बी.एन.सोनवणे,

श्रीमती निकम,व्ही.एन.दराडे,एन.आर.पवार,एस.आर.पैठणकर,एन.एम.वाघ,सीताराम ठोंबरे,सीताराम आरखडे, आर.एस.पाटील,एस.एम.सानप आदींचा सत्कार संभाजीराजे पवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.प्रास्ताविक वसंत विंचू यांनी,सूत्रसंचालन तुकाराम डरांगे यांनी केले तर आभार संतोष विंचू यांनी मानले  केले.नवलसिंग महाले,प्रदीप पवार,उद्योजक गोरखआबा पवार,माजी नगरसेवक राजेंद्र लोणारी,प्रमोद सस्कर,शितल शिंदे,बाजार समितीचे संचालक बापू गायकवाड,पर्यवेक्षक आर.जी.पैठणकर,विजय जाधव, अंबादास निकम,विलासराव काटे,भगवान काटे,दिपक काटे,शिक्षक नेते आण्णासाहेब काटे,अनिल साळुंके,प्राचार्य डी.बी.नागरे,उपप्राचार्य मारुती अलगट,जालींदर पवार,अशोक भुरुक,नंदु घोडेराव,माधवराव ढोमसे,प्रशांत शिंदे,आबासाहेब शिंदे,संतोष जाधव,नथुआप्पा लिंगायत,आकाश पवार,छबुराव ढोमसे,शिवाजी ढोमसे, भाऊलाल ढोमसे,रामदास म्हाळसकर,महंत बापु कुलकर्णी, तुकारामबाबा पवार,छगन गोविंद,हुसेन तांबोळी,गयासुद्दीन तांबोळी,छायाताई गांगुर्डे,आबासाहेब कछवा,प्रतिभा मांडवडे,बळीराम मांडवडे,राजेंद्र पाटील,प्रशांत सोळंकी,दिनकरराव पवार,कचेश्वर काटे,बबन काटे, गजानन तिवारी,नाना काकड, किशोर गायकवाड,सुनिल जगताप,संपत ढोमसे,काशिनाथ ढोमसे,आण्णासाहेब ढोमसे,श्रीराम ढोमसे,रमेश ढोमसे,योगेश हांडे, तानाजी ढोमसे आदींसह असंख्य हितचिंतक उपस्थित होते.न्यू इंग्लिश स्कुलच्या शिक्षकांनी संयोजन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here