मोफत नेत्रतपासणी व मोतीबींदु शस्त्रक्रिया शिबीराला उत्तम प्रतिसाद 

0

उरण दि 29 (विठ्ठल ममताबादे ) डोळ्यांचे विविध आजार,डोळ्यांचे वाढते पेशंटची संख्या लक्षात घेता नागरिकांना डोळे तपासणी, मोतीबींदू शस्त्रक्रीया बाबत त्यांच्या घराजवळच सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटल नवीन पनवेल व महेश म्हात्रे आणि अनंत घरत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मराठी शाळा नागाव – उरण येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 102  नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यापैकी 15 जणांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती महेश म्हात्रे यांनी दिली.सामाजिक कार्यकर्ते महेश म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते अनंत घरत हे एकमेकांचे मित्र असून या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत अनेक वर्षापासून  नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर राबवत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या शिबीराला दरवर्षी जनतेचा उत्तम प्रतिसादही मिळत असतो. यावेळी झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील व संपूर्ण टीम,महेश म्हात्रे, अनंत घरत तसेच मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, नागाव ग्रामपंचायतचे सरपंच चेतन गायकवाड व ग्रामपंचायतचे इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here