मंचर, पुणे : मंचर येथील ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, व्याखाते, जादुगार, मुक्त पत्रकार आणि बहूभाषिक कवी मोहम्मदशकील जाफरी यांना ‘भावना सामाजिक संस्था आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्था, नाशिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा “राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार – 2023” देऊन मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
गेल्या 35 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कला आणि साहित्यीक क्षेत्रात कार्यरत असलेले मोहम्मदशकील जाफरी यांना सदर पुरस्कार नाशिक येथील ‘मु. शं. औरंगाबादकर सभागृह’ मध्ये आयोजित एका कार्यक्रमात देऊन गौरविण्यात आले.
या वेळी मा. नानासाहेब बोरस्ते (माजी शिक्षक आमदार), मा. विनोद शांताराम अंबरकर ( निवृत्त पोलिस आधिकारी), मा. डॉ. बापुराव देसाई, प्रा. वाजिद आली खान (सेक्रटरी, युनिट सामाजिक संस्था), प्रो. जमील कुरैशी (अध्यक्ष, युनिट सामाजिक संस्था), मा. राहूल मोरे पाटील (अध्यक्ष, भावना सामाजिक संस्था), मा. महेश मुळे (सेक्रेटरी, भावना सामाजिक संस्था), मा. अलकाताई गायकवाड, मा. एजाज सिद्दीकी, मा. भाऊसाहेब बावा, मा. कविताताई मेहंदळे, प्रा. लीलाताई जंजीरे, प्रो. अक्रम खान आणि मा. मंजुषा दीक्षित यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते.