येवला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे रक्षाबंधन निमित्त राखी बांधण्याचा कार्यक्रम संपन्न.

0

येवला प्रतिनिधी….

 शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे रक्षाबंधन सणानिमित्त येवला शहर पोलिस स्टेशन व येवला नगर पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून साजरा करण्यात आला.

            राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रेरणेने व महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणताई बलकवडे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कर्मचारी व सफाई कामगार आपल्या परिवाराची चिंता न करता अहोरात्र कर्तव्यावर असतात म्हणून येवला शहर राष्ट्रवादी महिला काँगेसच्या पदाधिकारी महिलांन तर्फे येवला शहर पोलिस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार कदम,पोलीस उप निरीक्षक सुरज मेंढे,पोलिस हवालदार शेख व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधून तर नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी वर्षभर स्वच्छतेचे काम करत असतात त्यांना देखील नगर परिषद कार्यालयात जाऊन सफाई निरीक्षक श्री झावरे व सहकारी कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला या वेळी येवला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष राजश्री पहिलवान,अल्का जेजुरकर,समीना शेख,सुनिता लहरे,सिमा गायकवाड,जमीला शहा,निता भागवत,कांता राऊळ,पुष्पा इंगळे,नंदा राऊळ,रुक्साना अन्सारी आदी उपस्थित होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here