पैठण : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त संत गाडगेबाबाना अभिवादन,माणुसकी रुग्ण सेवा समुहा तर्फे व सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवा भावी संस्थेच्या वतीने माणुसकी वृध्दाश्रमास जटवाडा रोड येथे गाडगेबाबाना विनम्र अभिवादन करण्यात आले. समाजसेवक सुमित यांनी गाडगेबाबांची प्रेरणा घेवून समाजसेवेला सुरवात केली आहे.
बाबांचे प्रेरणादाई विचार संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी विचार.अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा,जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो,दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका,दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा,दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही,धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका,माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप,माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे,शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे उपस्थिताना सुमित यांनी गाडगेबाबा यांचे विचार सांगीतले. यावेळी उपस्थित माणुसकी समुहाचे सभासद समाजसेवक सुमित पंडित,प्रा.शरद सोनवणे सर,अशोक खील्लारे,राठोम मामा,शाम ढवळे,सौ. पूजा पंडित,सुनिता ढवळे,लक्ष्मी पंडित,आदी उपस्थित होते.