पैठण,दिं.१५:बोरगाव येथील महिला वाण देण्यासाठी पैठणला ॲपे रिक्षातून जात असताना पैठण -औरंगाबाद रस्त्यावर कातपुर फाट्याजवळ तिन चाकी अँपे रिक्षा पलटी झाल्याने शालुबाई सोनाजी हिवराळे या महिलेचा मृत्यू झाला .
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की बोरगाव येथील शालुबाई हिवराळे वय ६५ ह्या आज संक्रांतीच्या सणानिमित्त वान देण्यासाठी बोरगाव येथून पैठण कडे जात होत्या . साधारणता अकराच्या सुमारास कातपुर फाट्याजवळ अँपे रिक्षा पलटी झाली यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना पैठण येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले .अपघाताची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे बीट जमादार राहुल मोहतमल , कर्तारसिग सिंघल यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन रुग्णालयात जावुन पंचनामा केला .