विद्यार्थ्याना मैदानी खेळासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे :- नगराध्यक्ष फिरोज दोसानी

0
फोटो ओळी : शहरातील जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना नगराध्यक्ष फिरोज दोसानी व इतर मान्यवर.

माहूर:- विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच मैदानी खेळामध्ये अग्रेसर राहिले पाहिजे,शरीर व मन तंदुरुस्त राहण्या करिता मैदानी खेळ आवश्यक आहेत. पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसांनी यांनी शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
शहरातील जीनियस किड्स इंटर नॅशनल स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन आज दिनांक १९ रोजी करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते करण्यात आले.नगर सेवक प्रतिनिधी निसार कुरेशी, नगरसेवक प्रतिनिधी विक्रम राठोड,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे  यांची प्रमुख उपस्थिती होती.
आधुनिक – तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस मैदानी खेळाचे महत्व कमी होत चालले आहे. विद्यार्थ्याने शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळावे शालेय क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. बाल वयातच खेळाची गोडी निर्माण झाल्यास त्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होते.प्रत्येक खेळाडूने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर क्रीडा स्पर्धेतून यशाचे शिखर गाठावे अशा शुभेच्छा ही  नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी दिल्या.आकाश भवरे,प्रशांत देशमुख, अल्फाज शेख,शुभम गायकवाड  रितू ताई,आकाश राठोड,सोहेल खान,प्रफूल भवरे राहूल गिऱ्हे,वर्षा कराळे,राजू गुलफूलवार ,वैभव मुडाणकर,  विक्रांत चव्हाण यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here