उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी नोड मध्ये साफसफाई कामगार भरतीमध्ये दिव्यांगाना प्राधान्य मिळावे तसेच गावातील कमिटी मध्ये गावातील किमान एक दिव्यांग बांधवांचा समावेश करून घ्यावे.या प्रमुख मागणीसाठी गावातील दिव्यांग बांधव हे मंगळवार दिनांक २५/३/२०२५ रोजी बोकडविरा ग्रामपंचायत येथे सकाळी १० वाजता धरणे आंदोलनाला बसणार आहेत. तरी सर्व बोकडविरा गावातील ग्रामस्थ बंधू भगिनीनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन बोकडविरा गावातील दिव्यांग बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.