शिक्षक कौशिक ठाकूर व सुनील नऱ्हे यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.

0

उरण दि २(विठ्ठल ममताबादे )सोमवार, दिनांक १ मे २०२३ रोजी रा. जि. प शाळा सारडेचे आदर्श शिक्षक कौशिक मधुकर ठाकूर आणि शिक्षक सुनिल कचरू नर्हे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ सारडे यांच्या वतीने पार पडला.सदरच्या वेळी रा.जी.प शाळेच्या मुलांनी लेझीम च्या ठेक्यावर सत्कारमूर्ती शिक्षक कौशिक ठाकूर आणि शिक्षक सुनील नर्हे  यांचे शाळेमध्ये आगमन केले. भारतीय संस्कृती प्रमाणे औक्षण करण्यात आले.

तद्नंतर शाळेच्या कार्यक्रम हॉल मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हे सारडे ग्रामपंचायतचे सरपंच  रोशन पांडुरंग पाटील यांना देण्यात आले. सूत्र संचालन प्रा.सुशांत माळी यांनी केले तर प्रस्ताविक स्वप्नील पाटील यांनी केले. यावेळी सारडे ग्रामस्थांच्या मार्फत तसेच रा जि प शाळा सारडे, शाळा व्यवस्थापन कमिटी सारडे,ग्रामपंचायत सारडे,विविध ग्रुप,प्रतिष्ठित नागरिक,विद्यार्थी यांच्या मार्फत दोन्ही सत्कारमूर्तीचे सत्कार करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

         यावेळी कु.संचिता पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.उर्मिला म्हात्रे ,भार्गव म्हात्रे, शांताराम म्हात्रे,मनोज पाटील,विशाल म्हात्रे,चंद्रशेखर पाटील यांनी दोन्ही सत्कारमूर्ती बद्दल मनोगत व्यक्त केले. तद्नंतर शिक्षक सुनील नर्हे यांनी मनोगत व्यक्त केले. आणि शिक्षक कौशिक ठाकूर  यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तीचे चेहरे हे भावूक झालेले पाहायला मिळाले.दोन्ही शिक्षकांनी शाळेसाठी १०,००० रुपये देणगी दिली. तसेच शाळेमधील गरज ओळखून शाळेला २ वाय फाय मशीन भेट दिली. कार्यक्रमा च्या शेवटी रोशन पाटील सरपंच सारडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.शेवटी सर्वांनी सनेहभोजन केले.सदरचा निरोगी समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here