नांदेड प्रतिनिधी
येथील गोकुळ नगर भागातील सुभाष नगर हाऊसिंग सोसायटी येथील प्रतिष्ठित नागरिक तथा पवन टी हाऊसचे मालक शामसुंदर गोवर्धन दास जी अग्रवाल यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दि.१२ मार्च गुरुवारी रोजी पहाटे ०२ वाजता राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दि.१२ मार्च गुरुवार रोजी दुपारी ०१ वाजता गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुनबाई व नातवंडे असा मोठा परिवार आहे