समाजाला भूषण वाटावं अस आदर्श जाधव दाम्पत्य ..

0

 मातृतिर्थ सिंदखेड राजा येथील आंबेडकरी चळवळीचे स्मृतीशेष नागोराव जाधव गुरूजी ज्यांनी १४ आक्टोंबर १९५६ साली नागपूर दिशाभूमी येथे डॅा. बाबासाहेब आंहेडकरांचे दर्शन घेवून बुध्द धर्माचा स्विकार करून डॅा. बाबासाहेबांचे विचार व चळवळी साठी नोकरीचा राजीनामा देवून मरेपर्यंत आंबेडकरी विचार खेड्यापाड्यात पोहचवनाऱ्या त्या त्यांगी पूरूषांच्या पोटी जन्मलेले हे सुपुत्र वडीलांच्या पायावर पाव ठेवनारे एस टी महामंडळ महाराष्ट्र कास्ट्राइब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, सेवानिवृत्त राज्यपरिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रक   दैनिक सम्राट चे  बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी आदरणीय बाबासाहेब नागोराव जाधव व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी   बुलडाणा विमलताई बाबासाहेब जाधव यांच्या लग्न परिणय दिनाचा आज ४३ वा वाढदिवस.

 मेड फॉर इच अदर  अशा प्रकारची ही जोडी महामानव तथागत भगवान बुद्ध  बोधी  सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे सर्वोच्च आदर्श. त्यांचे विचार व कार्य आचरणात आणून  सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक पत्रकारिता क्षेत्रामध्ये बहुमोल अशा प्रकारचे योगदान दिले. दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातूनच सर्वांगीण प्रगती होऊ शकते. यावर ठाम विश्वास ठेऊन विमलताई बाबासाहेब जाधव यांनी एसएससी डीएड झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिकेची नोकरी स्वीकारून सेवा अंतर्गत  त्यांनी उच्च शिक्षण घेतले. एम ए एम एड पर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागामध्ये गोरगरीब शेतकरी कष्टकरी मुला मुलींना  शिक्षणाची आवड लावली. काळाच्या कसोटीला टिकेल  अशा प्रकारचे दर्जेदार शिक्षण दिले. विद्यार्थी प्रिय शिक्षिका शिस्तप्रिय मुख्याध्यापिका शिक्षण विभाग कार्यालय अधिकारी व शिक्षकांमध्ये समन्वय ठेवून कार्य करणाऱ्या केंद्रप्रमुख जिल्हा परिषद शिक्षण विभागाची आपल्या पारदर्शक कार्यशैलीने  विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकारी या भूमिका त्यांनी समर्पित भावनेने पार पाडल्या.

 एक आदर्श संस्कारक्षम शिक्षिका माता म्हणून त्यांचा आदर्श  शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व शिक्षक वृंदानी घेतला पाहिजे.”कुटुंब लहान सुख महान  एक मूल गुलाब का फुल” हा ऐकायला सुखद  परंतु कृती करण्यासाठी अतिशय अवघड असा विचार विमल ताई  व बाबासाहेब जाधव यांनी आचरणात आणला. पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर आपल्या या लाडक्या सुपुत्राच नाव विचारपूर्वक  योगेश ठेवले. त्याच्यावर चारित्र्य नीतिमत्ता सदाचारांचे संस्कार बिंबवले. त्यांचे हे सुपुत्र  डॉक्टर योगेश  यांनी वैद्यकीय क्षेत्रामधील सर्वोच्च शिक्षण  एमबीबीएस व आमेरिकेत एमडी प्राविण्‍यामध्ये उत्तीर्ण केले. डॉक्टर योगेश  व त्यांच्या सहचारिणी डॉक्टर श्रवंती ह्या एमडी मेडीसिन तसेच लन्स तज्ञ आहे व ते अमेरिकेमधील प्रतिष्ठीत नावालेल्या दवाखान्यामध्ये उच्च पदावर सेवा देत आहेत. आपले पूज्य आई वडील यांची सेवा करण्यामध्ये ते कुठेही कमी पडताना दिसत नाहीत आईवडिलांच्या सेवा ते कधीच कमी पडू देत नाही सर्व जिवना आवश्यक सुख सुविधांची व्यवस्था करूण दिली आहे हे दापंत्य सहामहीने आमेरिकेत व सहामहीने भारतात राहतात जेव्हा मनात आले तेव्हा जातात जे पेरले तेच उगवते चांगले पेरा चांगले उगवेल त्याप्रमाणे जसे संस्कार रूजविले तसे मुले घडविले जातात म्हणून लहान पणा पासून घरात सूसंस्कार असले की, मुलांनवर तेच संस्कार पूढे मुलांवर पडत असतात व त्याचे अनुकरण मुले करत असतात म्हणून या दापंत्यांनी चांगले संस्कार रूजविले म्हणून मुले चांगली निघाली.विज्ञानाच्या जगात मोबाईल मुळे जग जवळ आले आहे त्यामुळे जग जवळ आले आहे कोठेही हि राहा आपण जवळच आहे त्यामुळे काहीच वाटत नाही फक्त प्रेम आणि जिव्हाळा पाहीजे ते गुण मुलामध्ये आहे म्हणून स्वत: रोज सकाळ संध्याकाळ चौकसी करीत असतात.सामाजिक बांधिलकी मधून  गरीब गरजू बांधवांना ते आईवडिलांना धार्मिक कामात मदत करत असतात. अमेरिकेमध्ये जरी ते राहत असले तरी त्यांनी  आई-वडिलांसाठी संभाजीनगर या ठिकाणी  अतिशय भव्य आणि दिव्य फ्लॅट घेऊन दिला.

विमल ताई व बाबासाहेब जाधव यांनी  सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले आहे. अनेक ठिकाणी बुलडाणा जिल्ह्यातील बुद्ध विहारांना मोठ्या प्रमाणावर दान दिले, जनसेवा हीच इशसेवा हे ब्रीद वाक्य घेवून वागणारे हे दापंत्यांनी २०१९ च्या कोवीड महामारित त्यांनी एक लाख पंच्याहत्तर रूपयाचे गोरगरिबांना घरोघरी जाऊन आर्थिक मदत केली, अंध,अपंग,गरजू, अन्नदान, वस्रदान,रूग्ण, गरिब विद्यार्थ्यांना आर्थीक मदत असे विविध उपक्रमातून १९८८ पासून डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगीतलेल्या आपल्या कमईतला विसावा भाग समाजासाठी खर्च करावा हे व्याक्याचे तंतोतंत पालन करून हे दानसूर दापंत्य दरवर्षी एक लाखाचे आर्थीक दान करित आहे. 

 आंबेडकरी चळवळीच मुखपत्र  दैनिक वृत्तरत्न सम्राट या वर्तमानपत्राला  सढळ हाताने ते जाहिराती देत असतात. दैनिक वृत्तरत्न चे संपादक स्मृतीशेष बबन कांबळे यांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये  घरोघरी वृत्तरत्न सम्राट  पोहोचवण्याचं काम जिल्हा प्रतिनिधी या नात्याने बाबासाहेब जाधव करत असतात.

 केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्याशी बाबासाहेब जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, ते १९७६ पासून त्यांचे एकनिष्ठ कार्यकरते आहे कोणतीही आपेक्षा न ठेवता एकनिष्ठता व प्रेम ठेवून आज पर्यंत त्यांचे सोबत एकनिष्ठ तेने राहात आहे. बुलढाणा जिल्हा रिपाई आठवले गटाचे ज्येष्ठ  पदाधिकारी म्हणून त्यांच कार्य सर्वश्रुत आहे.

 अशा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आदर्श दाम्पत्याचा ४३ वा लग्न परिणय वाढदिवसाचा दिवस. माझ्यावर आंबेडकरी व धम्मविचाराचे संस्कार टाकण्याचं काम त्यांनी केलेल आहे.या मंगल प्रसंगी उभयतांना आयो आरोग्य बल वैभव धनसंपदा प्राप्त हो ही मनोकामना. पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे उभयतांचं आयुष्य प्रकाशमान होवो ही सदिच्छा….!

 श्रीकांत हिवाळे सर तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जिल्हा परभणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here