माहूर:- संत गाडगेबाबांच्या शिकवणी प्रमाणे मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा, मानवी सेवेतून मनाला खरा आनंद मिळतो,हे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे.दहा दिवसीय निवासी शिष्यवृत्ती शिबिरात मला १०० विद्यार्थ्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय करण्याची संधी मिळाली याला मी माझे भाग्यच समजतो असे मत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांनी व्यक्त केले.
माहूर शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी आर.आर.जाधव यांनी काल गुरुवारी द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांना जिल्हा परिषद नांदेड च्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर व शिक्षण अधिकारी प्राथमिक सविता बिरगे यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे.देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात माहूर येथे आयोजित तालुकास्तरीय निवासी दिनांक १ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २३ या कालावधीत विद्यार्थ्यांना स्वादिष्ट जेवन देऊन “मानव सेवा केलेली आहे.हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.असे सांगत साईनाथ महाराजांच्या अनमोल कार्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे.काल गुरुवार रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी रवींद्र जाधव यांनी साईनाथ महाराज वसमतकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविले.या वेळी एस.एस.पाटील, संतोष गंधे, बालाजी येरमे, सुधीर जाधव, भाग्यवान भवरे,भाऊराव पाटील यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
माहूर गडावर वसमतकर महाराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साईनाथ महाराज यांचा मोठा मठ आहे या मठा मध्ये राज्यातील दत्तभक्त मोठ्या संख्येने भेट देतात व महाराजांचे आशीर्वाद घेतात. विश्वशांती करिता श्री साईनाथ महाराज वसमतकर हे मार्च महिन्यामध्ये पंजाब राज्यात भारत पाकिस्तान सीमे जवळ हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त भक्त पारायण करणार आहेत. या कार्यक्रमास माहूर शहरासह नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यातील दत्त भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती दभप साईनाथ महाराज यांनी दिली आहे आहे.