उरण दि 14(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात श्री साईबाबांची भक्ती करणारा, साईबाबांना मानणारा खूप मोठा वर्ग असून उरण मधील अनेक प्रसिद्ध मंदिरापैकी खोपटे येथील श्री साईबाबा मंदिर प्रसिद्ध आहे.या मंदिराचा 5 वा वर्धापन दिन दि.13/12/2022 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळी काकडा आरती,मंगळ स्नान,होम हवन नवग्रह पुजन, रूद्र पुजन, कुळदैवत, भवानी पुजन, श्री सत्यनारायण पुजा, श्री साईबाबा मध्यान आरती नंतर साई भंडारा महाप्रसाद चालू झाला तो रात्री 11वाजेपर्यत चालुच होता.संध्याकाळी 5 वाजता श्री गोपाळ काका हरीपाठ मंडळाचा हरीपाठ कार्यक्रम, सायंकाळी 7 वाजता श्री साईबाबा ची सांज आरती,आठ वाजता वडग्रुप प्रस्तुत साईगितांचा भक्तीमय गायन कार्यक्रम संपन्न झाला.
सदर धार्मिक कार्यक्रम, वर्धापन साजरा करण्यासाठी डाकी कुटुंब, श्री साई सेवक मंडळ खोपटे, नवतरुण गणेश नवरात्रौत्सव मंडळ, पूर्व विभाग साई सेवक, ग्रामस्थ मंडळ खोपटे-बांधपाडा, साईसेवक व मित्र परिवार आदींनी विशेष मेहनत घेतली.