सातारा/अनिल वीर : अंगणवाडी सेविका – मदतनीस यांनी विविध मागण्यासाठी येथील जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढुन निवेदन सादर करण्यात आली.
माधनाऐवजी पगार मिळावा. सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा. सेवानिवृत्तीनंतर मासिक पेन्शन,गॅज्युएटी,थकीत एक रक्कमी पेंशन व्याजासह मिळावी. माधन पगार दरमाह ५ तारखे पर्यंत मिळावेत. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त मानधन दिले जाते. त्या राज्यांप्रमाणे जास्त मासिक मानधन मिळावे. राज्य सरकारने समान काम समान वेतन घटनेच्या कलम १४ प्रमाणे कार्यवाही करावी.कोव्हिड काळातील प्रोत्साहन भत्ता सेवीका व मदतनीस यांना देण्यात यावा.मोबाईल रिचार्ज दर वाढ व्हावी.सेविका मदतनीस रिक्त जागा भरण्यात याव्यात. सुप्रीम कोर्टाचे निर्णय व हाय कोर्टाचे निर्णय यांचा आधर करून केंद्र व राज्य सरकारने निर्णय करावेत. घटनात्मक मागणीसाठी संप असल्याने संपकाळ कर्तव्य अर्थ मानधनी सेवा समजली जावून आंदोलन काळात कोणतीही कपात केली जाऊ नये.अशा अनेज मागण्यांचे निवेदन राज्याध्यक्ष सुजाता रणनवरे तसेच सातारा जिल्हा अंदोलन समिती अध्यक्ष छाया पन्हाळाकर, मिनी अध्यक्षा मनिषा चव्हाण व जिल्हाध्यक्षा ग्रामीण अर्चना अहिरे यांच्या स्वाक्षरीनिशी निवेदन संबंधितांना देण्यात आले.या वेळी सेविका मदतनीस तसेच अंदोलन समितीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होत्या.