सावरगाव विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा

0

येवला, प्रतिनिधी…..

सावरगाव येथील न्यु इंग्लिश स्कुल माध्यमिक व एम. जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात सवाद्य प्रभातफेरी, विद्यार्थी गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल शिक्षण संस्थेचे संचालक,नगरसुलचे माजी सरपंच प्रसाददादा पाटील होते तर युवा नेते अजित पवार यांच्या हस्ते ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला श्री.काकड,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र शेलार,सामाजिक कार्यकर्ते कचूनाना काटे,विरपत्नी सुचित्रा पानमळे,विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.बी.नागरे, पर्यवेक्षिका सविता सौंदाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी सकाळी विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री.काकड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजपूजन करण्यात आले.तर प्रसाददादा पाटील व अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यालयाची गाणकोकिळा आम्रपाली पगारे हिने गायलेल्या ए मेरे वतन के लोगो…गीताचे ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध देशभक्तीपर नृत्यगीतांना देखील सर्वांनीच दाद देऊन भरघोस बक्षीस दिले.सावरगाव विद्यालयाची दैदिप्यमान वाटचाल मुख्याध्यापक डी.बी.नागरे यांनी मनोगतातून मांडली.प्रजासत्ताक दिनाचा इतिहास समीक्षा म्हस्के हिने मनोगतातून सांगितला.

शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल संस्थेचे संस्थापक स्व.अण्णाबाबा पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धासह वार्षिक स्नेहसंमेलनात बक्षिसे पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.सूत्रसंचालन वसंत विंचू व संतोष विंचू यांनी केले.जेष्ठ शिक्षक गजानन नागरे,कैलास मोरे,संजय बहिरम, उमाकांत आहेर,योगेश भालेराव,सुमेध कुऱ्हाडे,नाना लहरे,योगेश पवार,रविंद्र दाभाडे, संजय बहिरम,अंजना पवार,सगुना काळे,अनंत कोळी,सुधीर मडके,मयुरेश पैठणकर,रोहित गरुड,निलेश व्हनमाने,मच्छीन्द्र बोडके,लक्ष्मण सांगळे,सागर मुंढे,आकाश नागपुरे आदीनी नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here