उरण दि. १३ (विठ्ठल ममताबादे ) सुधीर घरत सामाजिक संस्थेमार्फत वर्षभरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात या संस्थेने आजपर्यंत अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. अनेक विविध नागरि समस्या देखील या संस्थेने सोडविले आहेत.सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक,कला, क्रिडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुधीर घरत सामाजिक संस्था महिला संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी बांधवांच्या सुखदु:खात सहभागी होत उरण तालुक्यातील चिरनेर येथील रानसई वाडी येथील आदिवासी बांधवासाठी वनभोजनाचे आयोजन केले. या वनभोजनाचा १००० हून अधिक आदिवासी बांधवानी लाभ घेतला. रानसई वाडीवर पहिल्यांदाच खूप मोठा मंडप व रात्रीची प्रकाश व्यवस्था करण्यात आली होती. तसेच वनभोजनाचा कार्यक्रमही एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते.भव्य दिव्य असे असे कार्यक्रम झाल्याने आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त करत आनंद साजरा केला.
रात्रीची वेळ असल्याने सर्वप्रथम लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आले होते.त्यानंतर महिला भगिणी साठी विविध स्पर्धा व होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या सर्वच स्पर्धेत आदिवासी बांधवानी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. या कार्यक्रमाला रायगड भूषण राजू मुंबईकर,सामाजिक कार्यकर्ते श्याम लेंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम झाल्याने या चांगल्या कार्याची संपूर्ण रायगड जिल्हयात जोरदार चर्चा झाली आहे.
यावेळी व्यासपीठावर सुधीर घरत सामाजिक संस्थेचे संस्थापक कामगार नेते सुधीर भाई घरत,महिला सामाजिक कार्यकर्त्या शैलजाताई घरत,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील (जसखार ),महिला सामाजिक कार्यकर्त्या संगीता पाटील (जसखार ), रायगड भूषण राजू मुंबईकर,सामाजिक कार्यकर्ते श्याम लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आदिवासी बांधवांसाठी रात्रंदिवस कार्यरत असणारे महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी आदिवासी बांधवांच्या व्यथा सर्वांसमोर मांडल्या व आदिवासी बांधव (आरोग्य सेवा)हॉस्पिटल सेवा पासून वंचित असल्याने रानसई वाड्यावर हॉस्पिटल बांधण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सुधीर घरत यांनी हॉस्पिटल बांधण्याकरीत सर्वोपरी सहकार्य करण्याचे वचन आदिवासी मित्र राजू मुंबईकर व सर्व आदिवासी बांधवांना दिले.
सर्वप्रथम आदिवासी वाडीवर वनभोजन व होम मिनिस्टर व लहान मुलांच्या स्पर्धा उत्तम रित्या संपन्न झाला व जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित,पपन पाटील यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर घरत सामाजिक संस्थेचे जयप्रकाश पाटील (अध्यक्ष ),जयप्रकाश भोईर (कार्याध्यक्ष ),अजित पाटील (उपाध्यक्ष ),संकेत कडू (सेक्रेटरी ),हरेश बंडा (सचिव ),नितीन पाटील (खजिनदार ),सदस्य -ज्ञानेश्वर भोईर,समीर घरत,मुकेश घरत,मुकेश गावंड,प्रतीक पाटील,प्रनीत घरत,आशिष कडू,पार्थ म्हात्रे,महिला सामाजिक कार्यकर्त्या मयुरी पाटील,जागृती पाटील,अनुजा भोईर,पल्लवी भोईर,सेजल घरत,नेहा कडू,श्वेता घरत यांनी विशेष मेहनत घेतली.