सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

0
डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर सामुदायिक वंदना

सातारा : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र,चैत्यभूमीचे शिल्पकार, भारतीय बौध्द महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष,बौध्दाचार्यांचे जनक, सुर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव भिमराव आंबेडकर यांच्या  ११० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

    येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भैय्यासाहेब यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रारंभी,धम्मबांधव उत्सव कमिटीचे मार्गदर्शक अंकुश (भाऊ) धाइंजे व द्राक्षा खंडकर यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे नंदकुमार काळे व मंगेश डावरे, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम विभागीय अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,सदस्य गणेश कारंडे, वंचितचे जिल्हा महासचिव गणेश भिसे,ज्येष्ट नागरिक धमबांधवचे बी.एल.माने,किशोर गायकवाड, पालिका संघटनेचे सागर गाडे व त्यांचे सर्व सहकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here