उरण दि १३ (विट्ठल ममताबादे ) : गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे. रक्ता अभावी कोणाचे जीव जावू नये. या अनुषंगाने दरवर्षी स्व. श्री गुलाबभाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ स्व.श्री. गुलाबभाई म्हात्रे मित्र मंडळ जसखार यांच्या तर्फे गरजूंना जीवनदान देण्याच्या उद्देशाने दरवर्षी जसखार येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. यंदा स्व. श्री गुलाबभाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रविवार दि १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत श्री रत्नेश्वरी मंदिर, जसखार, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे रक्तदान शिबीर,मोफत आरोग्य तपासणी शिबीर व डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . या रक्तदान शिबीरात एकूण ११६ रक्तदात्यांनी केले.मोफत आरोग्य तपासणी शिबीर व डोळे तपासणी शिबीराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.रक्तदान शिबिराला कच्छ युवा संघ ब्लड बँकेचे तर आरोग्य शिबीर व डोळे तपासणी शिबिराला अपोलो हॉस्पिटल बेलापूर नवी मुंबई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.एकंदरीत सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त रवि पाटील, दिनेश पाटील, शिवसेना नेते मधुकरशेठ ठाकूर,जसखार ग्रामपंचायतचे सरपंच काशीबाई ठाकूर, उद्योगपती सुदीप पाटील, माजी शिवसेना शाखा प्रमुख सुभाषभाई तांडेल, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य राकेश तांडेल, राहुल ठाकूर, सचिन घरत, सचिन ठाकूर, आशुतोष म्हात्रे,स्व. गुलाबभाई मित्र मंडळचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील,मंगेश ठाकूर, प्रकाश भगत, रविंद्र ठाकूर, जितेंद्र पाटील, भूषण मोकल, सचिन म्हात्रे, संजय म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, डोळे तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी स्व. गुलाबभाई मित्र मंडळचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी तसेच केतन म्हात्रे,आकाश म्हात्रे, गणेश म्हात्रे, उत्तम घरत, प्रणय म्हात्रे, धीरज म्हात्रे, योगेश म्हात्रेजितेश ठाकूर, साहिल ठाकूर ,अनिकेत ठाकूर, संकेत कडू, वेदांत ठाकूर, मनिष ठाकूर, करण ठाकूर, सचिन. म. ठाकूर, मयूर कडू, राकेश ठाकूर, परेश ठाकूर, सुयोग पाटील,आयुष ठाकूर, साहिल ठाकूर, सतिश तांडेल व मित्र परिवारांनी विशेष मेहनत घेतली. एकंदरीत रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, डोळे तपासणी शिबीर मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला.