येवला प्रतिनिधी ता १०
तालुक्यातील धुळगाव येथून सालाबादप्रमाणे टाळ मृदंगाच्या जयघोषात धुळगाव ते पुणतांबा दिंडी प्रस्थान झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील शेकडो दिंड्या मोठ्या उत्साहात चांगदेव महाराजांच्या श्री क्षेत्र पुणतांबा येथे जात असतात याच प्रमाणे तालुक्यातील धुळगाव येथील ह.भ.प.भगवान महाराज गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये आज दिंडी प्रस्थान झाली आहे. सकाळच्या सुमारास पावसाच्या झिमझिमच्या सरीमध्ये विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या आवाजात मोठ्या उत्साहात इथून दिंडी प्रस्थान झाली सुरुवातीला येथील शेळके पाटील कुटुंबियांकडून चहा पाण्याची सोय करण्यात आली होती.यानंतर दिंडी पुढे प्रस्थान झाली तीन दिवसाचा प्रवास करत श्रीक्षेत्र पुणतांबा येथे चांगदेव महाराजांच्या सोहळ्यासाठी हजारो लहान थोर वारकरी येत असतात. हीच परंपरा धुळगाव येथील वारकरी जपत असतात आणि न चुकता या वारीला नेहमी जात असतात.