उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )श्री संत वामनभाऊ श्री संत भगवान बाबा व श्री संत नारायण महाराज यांचा पुण्यतिथी चे औचित्य साधून दिनांक १४ १५ व १६ जानेवारी रोजी श्री संत वामनभाऊ भगवानबाबा सेवा ट्रस्ट चा माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम अत्यंत भव्यदिव्य व यशस्वीरीत्या पार पडला ज्यामध्ये प्रामुख्याने भजन कीर्तन हरिपाठ वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम तसेच रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी शिबीर असे अनेक समाजउपयोगी कार्यक्रम झाले. ज्यामध्ये सर्व भाविक भक्त सर्व समाजातील मंडळीने सहभाग दर्शविला. समाजाचे एक देणं म्हणून समाजासाठी काही समाजउपयोगी कार्यक्रम घेण्याचे नियोजन श्री संत वामनभाऊ भगवान बाबा ट्रस्ट चा माध्यमातून ठरवण्यात आले. श्री संत गाडगे बाबा (जन्म :- शेंडगाव, २३ फेब्रुवारी १८७६; – अमरावती, २० डिसेंबर १९५६) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगेबाबांचे कार्य आणि प्रेरणेतून ट्रस्ट ने दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी बामणडोंगरी रेल्वे स्थानक येथे स्वच्छता मोहीम शिबीर आयोजित केले होते सदर स्वच्छता शिबिरामध्ये ट्रस्ट मधील सर्व सदस्य तसेच समाजातील जेष्ठ आणि सर्व वडीलधाऱ्या मंडळीने तसेच लहान मुलांनी हि सहभाग नोंदवला व रेल्वे स्थानकाचा परिसर स्वच्छ केला .पुढील काही काळात असेच समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचा आणि समाजाचा माध्यमातून पूर्णत्वास नेण्याचा श्री संत वामनभाऊ संत भगवानबाबा सेवा ट्रस्ट चा संकल्प आहे.