नांदगांव / मनमाड :
नांदगांव तालुक्यातील घाटमाथा परिसरावर झालेल्या गारपिट अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी थेट शेतकऱ्याच्या बांदावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
जातेगाव येथील आदिवासी वस्तीवरील कुटुंबाचे या गारपिटीत झोपडी उध्वस्त झाली, पत्रे उडून गेले, संसार उघड्यावर आला, या ठिकाणी स्वतः भेट देत सर्व संसार उभा करून देतो असे सांगत धीर दिला
यावेळी आमदार कांदे यांनी शेतकऱ्यांना धीर देताना म्हटले की अवकाळी पावसाने आणि गारपिटीने नुकसान झालेल्या १०० % पंचनामे केले जातील आणि नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल . त्यामुळे शेतकऱ्यांनो धीर सोडू नका आमदार व सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दोन दिवसात परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे १०० % पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले. यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची संख्या त्वरित वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.