संक्रापूर येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून मुलगी ठार

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी : 

 राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील अनुष्का सोमनाथ पांढरे वय ९ वर्षे ) या चिमुकलीचा मका  ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

     या घटनेची माहिती मिळताच गावकरी जमा होऊन काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शाळकरी मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने संतप्त झाले होते. सध्या अनेक ठिकाणी ऊस व मका कुट्टी डबल ट्रॉली ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक होत असल्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. आरटीओने लक्ष घालून अशा ट्रॅक्टर वर कारवाईची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here