उरण दि २(विठ्ठल ममताबादे )शहरी भागातील जन सामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणा-या नागरीकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्रे १५ वा वित्त आयोग अंतर्गत स्थापित केली जात आहेत. राज्यात १५ वा वित्त आयोग अंतर्गत मंजुर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचे टप्प्याटप्प्याने रुपांतर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” केंद्रामध्ये करण्यात आले. उरण तालुक्यात उरण नगर परिषद हद्दीतील कोटनाका येथे आपला दवाखाना चे उदघाटन महाराष्ट्र दिनी व कामगार दिनी सकाळी १० वाजता करण्यात आले.या कार्यक्रमास कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे जगप्रसिद्ध नेत्र तज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब उपस्थित होते. डॉक्टर रागिणी पारेख नेत्र रोग तज्ञ जे.जे.हॉस्पिटल मुंबई, रवी भोईर उरण तालुका भाजप अध्यक्ष तसेच नरेश रहाळकर माजी जिल्हाप्रमुख शिवसेना, राहुल इंगळे मुख्याधिकारी उरण नगरपरिषद,नरेश पेडवी नायब तहसीलदार उरण, डॉक्टर बाबासो काळेळ वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय उरण, डॉक्टर राजेंद्र इटकरे तालुका आरोग्य अधिकारी उरण,डॉक्टर काजल लकडे वैद्यकीय अधिकारी नागरी आरोग्य केंद्र कोट नाका, डॉक्टर श्रीकांत गायसमिंदर वैद्यकीय अधिकारी नागरी आरोग्य केंद्र बोरी पाखाडी, संतोष परदेशी तालुका आरोग्य सहाय्यक उरण , गणेश आगरकर तालुका बीसीएम आशा कर्मचारी व कोटगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात ३४२ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रांचे डिजीटल अनावरण एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि. ०१ मे २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता डिजीटल अनावरण करण्यात आले.उरण तालुक्यातही महाराष्ट्र शासनाचा आपला दवाखाना हा उपक्रम सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला.