उरण (विठ्ठल ममताबादे )
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, लायन्स क्लब उरण, लिओ क्लब उरण, राजेश शिवाजी महाराज मित्र मंडळ उरण तसेच माजी विद्यार्थी संघ उरण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले.
एमजीएम हॉस्पिटल व रक्तपेढी कामोठे यांच्या सहकार्याने महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन व लायन सदानंद गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी एन आर परमेश्वरन,जितेंद्र मिसाळ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), विशाल पाटेकर (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ), ज्ञानेश्वर कोठावदे (अध्यक्ष, लायन्स क्लब उरण),नेत्रज ओहोळ (अध्यक्ष लिओ क्लब उरण) आदी मान्यवर उपस्थित होते.
रमेश ठाकूर (सदस्य, महाविद्यालय विकास समिती) यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम.जी. लोणे यांनी यावेळी रक्तदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले व रक्तदान करण्याची गरज असल्याचे सांगितले. एकूण ३७ रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान केले. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. दत्ता हिंगमिरे,सह कार्यक्रमाधिकारी प्रा.विनिता तांडेल आय.क्यु.ए.सी समन्वयक डॉ. ए.आर. चव्हाण व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले. व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी मेहनत घेतली.