पैठण,दिं.२३: एमआयडीसी परिसरात ईद उत्साहात साजरी . गुलाब पुष्प देऊन दिल्या ईदच्या शुभेच्छा . पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची परीसरात मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असणारी रमजान ईद पिंपळवाडीसह परिसरात शनिवारी (ता,२२) रोजी मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य साईनाथ सोलाट तसेच पोलीस ठाणे एमआयडीसीच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन इदच्या शुभेच्छा देण्यात आल्या .
सकाळी साडे आठ वाजता पिंपळवाडी येथील ईदगाह मैदानावर एकत्रित नमाज पठण केल्यानंतर सर्व मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’ करत आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर परिसरात सर्वत्र ईदचा उत्साह पाहायला मिळाला. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लीम बांधवांच्या रोजाची सांगता शनिवार (ता.२२) रोजी झाली. रमजान ईद निमित्ताने अबालवृद्धांनी नवीन कपडे परिधान करून नमाज पठाण केले. सर्वधर्मीयांकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या . सामाजिक बंधुभाव, एकात्मता, भाईचारा वाढीस लागण्यात ईद महत्त्वाची ठरते. यावेळी पिंपळवाडी ,मुधलवाडी येथील सरपंच ,उपसरपंच ,माजी सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, तलाठी ,मंडळ अधिकारी सह एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याचे सपोनी भागवत नागरगोजे, फौजदार दिलीप चौरे ,बीट अंमलदार राहुल मोहतमल , रहाटवाड , राजेश चव्हाण , कृष्णा उगले, दिनेश दाभाडे,कोलते सह आदींनी यावेळी बंदोबस्त ठेवला होता .