उरण दि ११(विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे घारापुरी येथे रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानात उरण मधील ३९६ सदस्य उपस्थित होते. या अभियानात समुद्रकिनारा व सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. अभियानात एकूण ५३ टन ओला कचरा व १२ टन सुका कचरा साफ करण्यात आला.