सातारा/अनिल वीर : सद्या देशात व राज्यातील भाजपचे नेते बहुजन नायकांच्या बदनामीकारक वक्तव्य सतत करत आहे. सर्वसामान्य जनतेत रोष वाढत असतानाच छ. शिवरायांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य हे एका जबाबदार म्हणजेच राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीसह त्यांच्या विचारधारेतील मंत्री, आमदार,लोकप्रतिनिधी यांनी केल्याने भाजपेत्तर सर्वानी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन करून निषेध नोंदविण्यात येत आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊनच भाजपने या विषयापासून सर्व सामान्य जनतेचे मन विचलीत करण्यासाठीच हिंदू आक्रेश मोर्चाचा कुटील डाव खेळल्याचे आढळुन येत आहे.
हिंदवी स्वराज्याची संकल्पना छ.शिवरायांनी मांडली होती. छ.शिवाजी महाराज आणी एकूणच बहुजन नायकांच्या बदनामीकारक वक्तंव्याचा निषेध करून राज्यपाल हटाव आंदोलन राज्यस्तरावर महाघाडी व छ. शाहु,फुले,आंबेडकर व शिवप्रेमींनी यशस्वी पार पाडले असून सर्वत्र खदखद आहेच.
हिंदू खतरेमे है। या नावाखाली हिंदू जनआक्रोश आंदोलन सुरू झालेले थांबविणे गरजेचे आहे.तेव्हा सर्वानी एक होवून भाजपचा कुटील डाव उधळून लावला पाहिजे.असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे पश्चिम विभागीय अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले आहे.