तू. ह. वाजेकर विद्यालय समोरील जागेत सुधीर घरत सामाजिक संस्था बांधणार स्व खर्चाने बस शेड.

0

उरण दि. 3 ( विठ्ठल ममताबादे) : उरण पनवेल मार्गावर असलेले तुकाराम हरी वाजेकर हे उरण तालुक्यात शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असे शिक्षण केंद्र आहे. विद्यार्थी येथे मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत असतात. मात्र उरण पनवेल मार्गावर सध्या जिथे महामंडळच्या बसेस, नवी मुंबई महानगर पालिकेच्या बसेस थांबतात तिथे मात्र कोणतेही शेड नाही, बस थांबा नाही. त्यामुळे  शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. उन पाउस,  वादळ वारा सुरु असताना विद्यार्थी तासनतास उभेच असतात. तासन तास भर उन्हात विद्यार्थ्यांना उभे राहावे लागत आहे.बस थांबा नसल्याने विदयार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांची ही महत्वाची समस्या लक्षात घेउन तुकाराम हरी वाजेकर महाविद्यालय समोरील जागेत सुधीर घरत सामाजिक संस्थेने दोन बस थांबे बनवून तिथे सुसज्ज असे बस शेड स्व खर्चातून विद्यार्थ्यांना बांधून देणार आहे. त्यासाठी संस्थेने शासनाच्या संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार देखील केला आहे.लवकरच या सामाजिक संस्थेच्या पाठवपुराव्याला यश मिळणार असून यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात होणारा त्रास वाचणार आहे.

सुधीर घरत सामाजिक संस्थेचे संस्थापक सुधीर भाई घरत,अध्यक्ष जयप्रकाश पाटील, कार्याध्यक्ष जयप्रकाश भोईर,उपाध्यक्ष अजित पाटील, सेक्रेटरी संकेत कडू,सचिव हरेश बंडा,खजिनदार नितीन पाटील यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविली आहेत.आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या उत्तरदायित्वच्या सामाजिक बांधिलकीतून तुकाराम हरी वाजेकर विद्यालय समोर संस्थेतर्फे बांधण्यात येणाऱ्या बस थांबाचे, शेडच्या कार्याच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. अनेकांनी आपण चांगले काम करत आहात असे बोलून दाखविले. त्यामुळे या कार्यामुळे सर्वच प्रवाशी वर्गांना याचा लाभ होणार आहे.

तू. ह. वाजेकर. विद्यालय फुंडे समोर नवघर गावाच्या दिशेने उड्डाण पूल आहे. या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूस शालेय विद्यार्थी बस करिता दुतर्फी उभे असतात. बस थांबा नसल्याने विद्यार्थी रस्त्यावरच उभे राहतात. आता पर्यंत दोन अपघात देखील झाले आहेत त्यामध्ये विद्यार्थी जखमी झाले आहेत.विद्यार्थ्यांची गैरसोयी लक्षात घेता रस्त्याच्या कडेला दोन बस थांबा उभारावे.सदर जागा शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्या जागेवर दोन बस थांबे उभारण्याकरिता परवानगी मिळावी अशा प्रकारचा पत्रव्यवहार देखील संबंधित प्रशासना सोबत करण्यात आला आहे.अशी माहिती सुधीर घरत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here