उरण दि 4(विठ्ठल ममताबादे )
रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी पागोटे गावचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले, यामध्ये पागोटे ग्रामसुधारणा मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुरेंद्र पांडुरंग पाटील,नवनिर्वाचित खजिनदार ऋषिकेश किशोर म्हात्रे व युवासेनेचे नवघर उपविभाग अधिकारी कुमार जोमा मढवी यांचा समावेश आहे. यावेळी माजी आमदार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मनोहरशेठ भोईर यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सदर वेळी पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उप तालुका संघटक के एम घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश धर्मा पाटील, शाखाप्रमुख महेंद्र पंढरीनाथ पाटील,उपशाखाप्रमुख महेश जनार्धन पाटील, सेक्रेटरी मनोहर दशरथ तांडेल, खजिनदार प्रदीप गोमाजी पाटील, नितीन प्रकाश पाटील, हेमंत वासुदेव पाटील, धीरज भरत पाटील, साईराज पाटील, संदेश सुरेश पाटील, विनय हरेश्वर पाटील, मयूर भालचंद्र पाटील, माजी शाखाप्रमुख अनिल प्रभाकर पाटील, अरुण चंद्रकांत पाटील, प्रदीप गोविंद पाटील, अरुण महादेव पाटील, रुपेश अनंत पाटील, चंद्रकांत पांडुरंग पाटील, कैलास शांताराम पाटील, पंकज मधुकर पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.