पावसाची शक्यता,अतिवृष्टीमुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था 

0

मठ,शाळा,महाविद्यालय,मंगल कार्यालय घेतले ताब्यात मुख्याधिकारी संतोष आगळे यांची माहिती

पैठण प्रतिनिधी :- श्री संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रा महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक नाथांचे दर्शन घेण्यासाठी येतात.तर नाथ परिसरातील वळवंट,कावसानकर मैदान,जांभुळबन अशा ठिकाणी जवळपास दोनशेहून अधिक दिंड्यातील महाराज भजन किर्तन करून आनंदोत्सव साजरा करतात.मात्र यावर्षी हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने पाऊस,अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पैठण शहरातील जिल्हा परिषद शाळा,महाविद्यालय, मठ,मंगल कार्यालय,धर्मशाळा अशा ठिकाणी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिली असुन दिंड्यातील भाविकांची खबरदारी घ्यावी अशा सूचना मुख्याधिकारी  यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

……………………………………..

*या ठिकाणी केली दिंडीची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था*

*पैठण शहरातील महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल,जैन इंग्लिश स्कूल पितांबरी मंगल कार्यालय,इंद्रावती मंगल कार्यालय,झेंडूबा मठ, आस्वाद प्राथमिक शाळा,कहारवाडा प्राथमिक शाळा परदेशीपुरा प्राथमिक शाळा,जिल्हा परिषद प्राथमिक प्रशाला नगर परिषदेसमोर, नाग घाट,प्रतिष्ठान महाविद्यालय,शालिवाहन विद्यालय शिवेश्वर धर्मशाळा,वाणी धर्मशाळा गीता मंदिर,आशीर्वाद मंगल कार्यालय,हिंद स्कॉलर इंग्लिश स्कूल,जिल्हा परिषद शाळा नारळा राजे संभाजी सभागृह,मार्केट कमिटी,संतपीठ प्रशासकीय इमारत जलसंपदा विभाग,कार्यालय अशा विविध ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे*

……………………………………..

*दिंड्याची खबरदारी घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचना*

*हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे अशा परिस्थितीत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंडीची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था म्हणून पैठण शहरातील जिल्हा परिषद शाळा महाविद्यालय, मठ,धर्मशाळा, मंगल कार्यालयात केली आहे.पर्यायी व्यवस्था केलेल्या शाळा,संस्था यांनी नगर परिषद समन्वय अधिकारी यांना भाविकांची सोय करण्याकरिता सहाय्य पुरवणे अनिवार्य आहे. सर्व नगर परिषद समन्वय अधिकारी यांनी दिंडीची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था केलेल्या शाळा, संस्था यांच्या संपर्कात राहून भाविकांची आपत्कालीन परीस्थित गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here