बागेची आदिवासी वाडी , सारसई तालुका पनवेल येथे नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न

0

पहल सामाजिक संस्था नवी मुंबई,परिवर्तन सामाजिक संस्था पनवेल, उरण सामाजिक संस्था उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन.

उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या कातकरी उत्थान सप्तसुत्री कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके,तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12/03/2023 रोजी बागेची आदिवासी वाडी, सार सई, तालुका पनवेल येथे नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. पहल सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉ अंजली थंडाणी यांच्या सहकाऱ्यांनी सदर कॅम्प यशस्वी करण्यात आला. त्या शिबिरामध्ये अनेक आदिवासी समाजातील लोकांनी आपले डोळे चेक करून घेतले. त्यातील अनेक लोकांना मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून ज्यांना चष्मा लागला आहे त्यांना काही दिवसात मोफत चष्मा देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमा मध्ये प्रा राजेंद्र मढवी यांनी निरोगी डोळ्यांचे महत्त्व समजावून सांगितले. कॅम्प साठी डॉ सायली पट्टेकर, अल्पना गौर, प्राजक्ता ठाकरे, सुषमा आंग्रे, लावण्या यादव, पांडुरंग बाने, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पुजारी, रत्नाकर घरत उपस्थित होते. पहल सामाजिक संस्था, परिवर्तन सामाजिक संस्था, उरण सामाजिक संस्था यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी ह्या कॅम्प साठी खूप मेहनत घेतली. असा कॅम्प इतर आदिवासी वाडी वर घेण्यासाठी रत्नाकर घरत यांना 9422489602 या नंबर वर संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here