उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील पाणदिवे येथील शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वांना सुपरिचित असलेले व सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली च्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलात कार्यरत असणारे माध्यमिक शिक्षक मनोज महादेव पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील गुणवंत माध्यमिक शिक्षकांना देण्यात येणारा यंदाचा ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
१ लाख १० हजार रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ३ जानेवारी २०२३ रोजी सावित्रीमाई फुले जयंती दिनी मुंबईत होणाऱ्या शानदार शासकीय कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारीता आदी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.
सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल ,उपाध्यक्ष रविंद्र लिमये,कार्यवाह गीता पालरेचा ,सचिव रविकांत घोसाळकर व सर्व संचालक , सुधागड विद्यासंकुल कळंबोली चे प्राचार्य राजेंद्र पालवे ,उपप्राचार्य बी.डी.कसबे ,उपमुख्याध्यापिका सरोज पाटील ,कार्यालयीन अधीक्षक दत्ता शिंदे ,सर्व विभागाचे पर्यवेक्षक तसेच रायगड जिल्हातील सर्व मान्यवर व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य, प्रेम आणि प्रोत्साहनामुळेच हा पुरस्कार जाहिर झाला आहे अशी भावना मनोज पाटील यांनी व्यक्त केली आहे.