माहूर : माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाची मुदत दिनांक 16.01.2023 रोजी संपुष्टात आल्यामुळे बाजार समितीच्या प्रशासक पदी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था माहूर या कार्यालयाचे सहाय्यक निबंधक डी यु पाटील यांनी बुधवारी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
यावेळी बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले.बाजार समितीचे प्रभारी सचिव एस.डी. बोकसे, खुशाल डी. राठोड,प्रेमदास बी.जाधव,श्री जोगदंड उपस्थित होते.