माहूर बसस्थानकात पथनाट्याच्या माध्यमातून एड्स जनजागृती मोहीम .

0

माहूर: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड व शासकीय ग्रामीण रुग्णालय माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशक्ती कला मंच नांदेड यांनी शुक्रवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी ‘एच.आय.व्ही. एड्स जनजागरण पथनाट्य’ बस स्थानक माहूर परिसरात सादर केले.
                        सदर पथकाने पथनाट्याच्या माध्यमातून एच.आय.व्ही.एड्स बाबत गीत ,नाट्य रूपात उपस्थित नागरिकांना माहिती दिली. यावेळी  शिवशक्ती कला मंच चे शाहीर रमेश गिरी, शाहीर प्रकाश दांडेकर,आनंद भगत, परमेश्वर भल्लाळ, किरण दांडेकर, श्रीमती वंदना खरात,ग्रामीण रुग्णालय माहूरचे  शिवाजी साळुंखे,धिरेंद्र मुळे,सचिन कावळे उपस्थित होते.
              ग्रामीण रुग्णालय माहूरचे  शिवाजी साळुंखे यांनी उपस्थित नागरिकास एच आय व्ही/ एड्स बाबत मार्गदर्शन पर माहिती देऊन सदर पथनाट्य पथकाचे ग्रामीण रुग्णालय माहूरच्या वतीने आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here