मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील लखुराजे यांच्या साम्राज्यभूमी आडगावराजाचे भूमीपुत्र
बुलडाणा,(प्रतिनिधी)- विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना दैनिक भारत संग्राम आयोजित स्वर्गीय मधुकर खंडारे यांच्या स्मृतिपित्यर्थ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच समाज भूषण अर्जुनराव गवई यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2024-25 चे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
यामध्ये संत गाडगेबाबा समाज रत्न पुरस्कारसाठी लखुजी राजे यांच्या पावन भूमी असलेले आडगावराजा येथील भूमि माजी सरपंच तथा पत्रकार रामदास कहाळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सचिन खंडारे यांनी दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची निवड राज्यस्तरीय संत गाडगेबाबा समाज रत्न पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा साखरखेर्डा येथे 30 डिसेंबर रोजी होणार असून या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पूरस्कार बद्दल पत्रकारी,राजकीय, सामाजीक श्रेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी रामदास कहाळे यांना गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल यांचे अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.