राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत भक्ती भोईरने पटकाविले सिल्वर मेडल.

0

उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )

दिनांक २३ ते २७ऑगस्ट २०२३ रोजी हरिवंश ताना भगत स्टेडियम राची झारखंड येथे वाको इंडिया कॅडेट आणि जुनियर  नॅशनल किकबॉक्सिंग  चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये एकूण २८ राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान प्राप्त केले. उपस्थित मान्यवर झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष अग्रवाल यांच्या हस्ते महाराष्ट्र टीमला प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी देण्यात आली.यावेळी किक बॉक्सिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी करत भक्ती विजय भोईर हिने सिल्वर मेडल पटकाविले आहे. तिचेही यावेळी सत्कार करण्यात आला.

 महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष- निलेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रायगडचे अध्यक्ष-  सुधाकर घारे,जीवन ढाकवळ, आणि दीपेश सोलंकी  तसेच पेण तालुक्यातील युथ कराटे अकॅडमीचे अध्यक्ष आणि कोच-  संतोष मोकल, पनवेल अकॅडमीचे कोच शैलेश ठाकूर, उरण अकॅडमीचे कोच विजय भोईर,कुमार,यश जोशी नॅशनल कोच  यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या नॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये रायगडच्या अनेक विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.त्यापैकी भक्ती विजय भोईर हिला सिल्वर मेडल मिळाल्याने तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्रशिक्षक दीपक घरत तसेच विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, विकास भोईर यांचे भक्तीला नेहमी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.भक्ती विजय भोईर हिने तिचे वडील तथा इंटरनॅशनल किक बॉक्सिंग गोल्ड मेडलिस्ट विजय भोईर यांच्या पाउलावर पाउल टाकून नेत्रदीपक यश मिळविल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. नवघर गावातील ती प्रथम मुलगी आहे जिने राष्ट्रीय लेव्हलला किक बॉक्सिंग स्पर्धेत सिल्वर मेडल मिळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here