विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त युवकांचे मंत्री संजय शिरसाट यांना मैदानांसाठी साकडं!

0

उरण दि २८(विठ्ठल ममताबादे ) लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विस्थापित करण्यात आलेल्या तरघर, उलवे,कोंबडभुजे, गणेशपूरी या गावांतील युवकांना खेळासाठी मैदान उरलेले नाही. पूर्वी सर्व गावांलगत खेळाची स्वतंत्र मैदाने होती ती सर्व विमानतळाच्या कामासाठी घेण्यात आली.मात्र गावे विस्थापित करतांना सिडकोने एकाही गावाला स्वतंत्र खेळाच्या मैदानासाठी जागा दिली नाही.

त्यामुळे युवकांनी खेळण्यासाठी जायचे कुठे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली चार गावातील युवकांनी नामदार संजय शिरसाट यांची भेट घेवुन साकडं घातल. या कामी जातिने लक्ष घालून प्रकल्पग्रस्त युवकांना मैदाने मिळवून देण्यासाठी तातडीने बैठक बोलावून प्रकल्पग्रस्त युवकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नामदार संजय शिरसाट यांनी उपस्थितांना दिले.

कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आजपर्यंत चार ते पाच गावांसाठी सिडको कडून खेळाचे मैदान सोडविण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त तरुणांना स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांनंतर सदैव समाजासाठी तत्पर असणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे जनतेला एकमेव आधार वाटत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here