उरण दि 7( विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील बाझारपेठला लागून असलेल्या गणपती चौकात सर्वात जूने श्री हनुमानाचे मंदिर असून भाविक भक्तांच्या हाकेला धावून जाणारा दैवत म्हणून श्री. हनुमान देवतेची ख्याती असून उरण शहरातील गणपती चौकात असलेल्या श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. पहाटे 4 वा. महापूजा, पहाटे 5 वा.श्री हभप रमेश सखाराम डांगे यांचे किर्तन, सकाळी 8 ते दुपारी 12 वा या वेळेत श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ व श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ जेएनपीटी यांचे सुश्राव्य असे भजन, दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसाद, दुपारी 4 वा.अमृत कला संगीत बाल भजन मंडळ खारकोपर यांचे भजन, सायंकाळी 7 वा.जनाई प्रोडक्शन निर्मित ऑर्केस्ट्रा मिले सुर मेरा तुम्हारा, व सर्वात शेवटी रात्री 9 वा.पालखी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी पालखीला श्री गजानन प्रासादिक भजन मंडळाची साथ लाभली . असे विविध धार्मिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. भाविक भक्तांनीही श्री हनुमान मंदिरात येऊन रांगेत शांततेने उभे राहून श्री हनुमान देवतेचे दर्शन घेतले. विविध धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान जन्मोत्सव सामाजिक मंडळ उरण चे सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.एकंदरीत उरण शहरातील गणपती चौकातील हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला.