पैठण,दिं.२५: एमआयडीसी पैठण मधील संत पॉल चर्चमध्ये ख्रिसमस सण उत्साहात साजरा करण्यात आला . प्रभू येशू यांच्या जन्माचा सोहळा संत पॉल चर्चमध्ये मध्यरात्री साजरा करण्यात आला . या सोहळ्याची सुरुवात कॅरोलसिंगिंग या ख्रिस्ताचे गुणगान करणाऱ्या गायन – वादनाने झाली . चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह . डॉ . व्हेलेरियन फर्नांडिस यांच्या हस्ते मोठा पवित्र संगीत मिस्सा अर्पण करण्यात आला . याप्रसंगी धर्मगुरू रेव्ह . डॉ . व्हेलेरीयन फर्नांडिस यांचे प्रवचन झाले . ते म्हणाले की , प्रभूने या जगाच्या उद्धारासाठी , एकमेकांत विश्वास व प्रेम निर्माण करण्यासाठी अपार मेहनत घेतली . पापी लोकांच्या तारणासाठी , गोरगरिबांचे दुःख व कष्ट कमी करण्यासाठी प्रत्येकाने परिश्रम घेतले पाहिजे , असा संदेश देत भाविकांना महाप्रसाद वाटप करून ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी एमआयडीसी पैठण परिसरातील ख्रिस्त भाविक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमा झाले होते .यानंतर गोरगरीब भाविकांना कपड्याचे वाटप करण्यात आले यावेळी धर्मभगिनी सह फिलीप रक्षे,मारीयादास त्रिभुवन,सॅम्युअल रुपेकर,प्रसाद रणपिसे,सुनील साळवे,निलेश त्रिभुवन,आकाश हिवाळे,विशाल चांदेकर,प्रदीप त्रिभुवन,दीपक साळवे,प्रतीक रणपिसे, बाळासाहेब थोटे , दिलीप गायकवाड, विलास सोलनकर , योहान भोसले , बाळू त्रिभुवन सह आदी उपस्थित होते .