मा.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0

प्रथम,द्वितीय,तृतीय पारितोषिके मा.नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या तर्फे

पैठण,दिं.१९: भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि.25 डिसेंबर 2022 रोजी कै.दिगंबरराव कावसनकर स्टेडियम येथे करण्यात आले.या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, व तृतीय असे तीन पारितोषिके ठेवण्यात आले असून या स्पर्धेसाठी 2100 रुपये प्रवेश फीस असणार अशी माहिती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी दिली आहे.

भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या नेतृत्वाखाली  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 51000हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 31000 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 21000 हजार रुपये असे एकुण तीन पारितोषिके भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या तर्फे ठेवण्यात आले असुन या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी नाव नोंदणीसाठी अभिजित निंबाळकर यांच्या 9359360311 या मोबाईल क्रमांकवर संपर्क करावा असे आवाहन भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी केले आहे.

……………………………………..

*उत्कृष्ट खेळाडुंना यांच्याकडून राहणार बक्षिसे*

*अष्टपैलू खेळाडूंना7000 हजार रुपये बक्षीस माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे शहराध्यक्ष शेखर पाटील यांच्याकडून,तर उत्कृष्ट फलंदाज 5000 हजार रुपये भाऊसाहेब काळे,उत्कृष्ट गोलंदाज 5000 हजार रुपये भाऊसाहेब काळे,उत्कृष्ट यष्टीरक्षक 5000 हजार रुपये बंडु अंधाळे,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 5000 हजार रुपये भाजपचे सरचिटणीस सिद्धार्थ परदेशी,उत्कृष्ट पंच 5000 हजार रुपये रविराज क्षिरसागर,उत्कृष्ट समालोचक 5000 हजार रुपये माजी नगरसेवक सुनील रासणे,उत्कृष्ट प्रेषक 5000 रुपये समीर शुक्ल,उत्कृष्ट संघ 5000 हजार रुपये ज्ञानेश्वर दहिवाळ,उत्कृष्ट गुणलेखक 3000 हजार रुपये आहेर सर,उत्कृष्ट कर्णधार 3000 हजार रुपये अश्विनी लखमले यांच्याकडून भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उत्कृष्ट खेळाडुंना राहणार बक्षिसे*

……………………………………..

*संघासाठी नियम व अटी*

*सर्व सामने बाद पध्दतीचे राहील, प्रत्येक सामना ६ षटकारचा राहील, थ्रो( फेकी ) गोलंदाज स्पर्धेत चालणार नाही, एका खेळाडुला एकाच संघात खेळता येईल, पंचाचा निर्णय अंतीम राहिल व सर्व अधिकार आयोजकाकडे राखीव राहतील,टिप संघ नोंदणीसाठी ५० % रकम जमा केल्याशिवाय संघाचा प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही . फिस भरण्याची अंतीम तारीख दि.२२/१२/२०२२ अधिक महितीसाठी संपर्क 8381016527 या मोबाईल क्रमांकवर करावा*

            सुरज लोळगे

     भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष श्री क्षेत्र पैठण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here