केदार जाधवची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

0

पुणे ; टीम इंडियात एकेकाळी महाराष्ट्राचा झेंडा फडकवत ठेवणारा क्रिकेटर केदार जाधवनं आता निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधनं निवृत्ती स्वीकारत असल्याचं केदारनं सोशल मीडियावर जाहीर केलं.

केदारनं आपल्या निवृत्तीची घोषणा करताना लिहिलं, “माझ्या कारकीर्दीत तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. आज दुपारी तीन वाजल्यानंतर मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झालो आहे, असं समजा.”

आपली निवृत्ती जाहीर करण्याची केदारची ही पद्धत टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारी आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा करताना असाच एक संदेश प्रसारीत केला होता. केदारनं धोनीच्या पद्धतीनं निवृत्ती जाहीर केली, याचं क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटणार नाही. कारण केदारच्या कारकीर्दीत धोनीची महत्त्वाची भूमिका आहे.

महाराष्ट्राच्या संघासाठी खेळून मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केदारला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. पण रणजी ट्रॉफीतली फलंदाजी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अष्टपैलू कामगिरी यासाठी तो चाहत्यांच्या लक्षात राहिला.

आपल्या दर्जेदार आणि तंत्रशुद्ध खेळाच्या जोरावर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ठसा उमटवला. भारतीय क्रिकेट संघासारख्या जगातील तगड्या संघांपैकी एक असलेल्या संघात केदारनं स्थान मिळवलं, ते टिकवलं आणि तिथे तो बहरला देखील.

2014-15नंतर महेंद्र सिंग धोनीला साथ देऊ शकेल, अशा खालच्या फळीतल्या म्हणजे अगदी शेवटी येऊन खेळू शकेल अशा खेळाडूची, ‘फिनिशर’ची भारताला गरज होती. हे हेरून केदार जाधवनं आपला खेळ बदलण्यास सुरुवात केली. वन डे आणि ट्वेन्टी20मध्ये आपण संघात कुठे बसू शकतो, याचा तो विचार करू लागला. तंत्रशुद्ध खेळ आणि कौशल्याचा वापर करून त्याने त्याच्या खेळाची व्यापकता वाढवण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी जे फटके त्याने मारले नव्हते, ज्या झोनमध्ये रन्स काढल्या नव्हते तिथून देखील कशा रन्स कमवायच्या याचा विचार त्याने केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here